Saturday, February 17, 2018

हरिश्चंद्रगड Harishchandragad

अकोल्यापासून चे अंतर : 43.8km
स्थान : हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे.
पौराणिक महत्त्व : हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती.
गडावर जाण्याच्या वाटा गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत.
सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग: गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा’ या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट’ असेही म्हणतात.
रस्त्यातील व्याघ्रशिल्प: पाचनई कडील वाट हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते.
• राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे.
• हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबित, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्याक वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत.
पाहण्यासारखी ठिकाणे:
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर: येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.
चार खांब – चार युगांचे प्रतिक सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्या त जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते.
हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
तारामती शिखर:
शिवलिंग – पिंडी तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत. कोकणकडा या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
ऐतिहासिक महत्त्व:
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्री तील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्याडत जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. ‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला.

ghatghar dam

अकोल्यापासून चे अंतर :58.0 km.
अधिकृत नाव :घाटघर.
धरणाचा उद्देश :जलविद्युत निर्मिती.
अडवलेल्या नद्या: प्रवरा.
स्थान :घाटघर धरण.
सरासरी वार्षिक पाऊस : ५००० मी.मी. पेक्षा अधिक .
महत्तम उत्पादनक्षमता : २५० मेगावॅट.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला २२ कि.मी.अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यांची हद्द संपते. घाटघरचा कोकणकडा पाहण्यासारखा आहे. ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते. हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंचच उंच सरळ उभा कोकणकडा, दूरवर दिसणारा शहापूर तालुक्याचा भूभाग, कड्याला लागूनच असलेला जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणा-या गाड्या सारेच मनोहारी, विलोभनिय. घाटघर या ठिकाणी पावसाळ्यात ५००० मी.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो.
कोकणकड्याच्या खोलीचा वापर करून येथे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प जपानच्या जे.बी.आय.सी. या वित्त संस्थेच्या आर्थिक मदतीने साकारण्यात आला आहे. २५० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प हा ‘पंप स्टोरेज’ प्रकारचा आशिया खंडातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. घाटघर येथे बांधण्यात येत आलेल्या ऊर्ध्व धरणातील पाणी डोंगरात खोदलेल्या बोगद्यातून जलविद्युत प्रकल्पात सोडले जाते. या पाण्याच्या आधारे अवाढव्य टर्बाइन फिरून वीज निर्मिती होते व पाणी बोगद्याच्या खालील बाजूला निम्न धरणात सोडले जाते. रात्री ११ नंतर सुमारे ७ तास विजेचा वापर करून चोंडे येथील निम्न जलाशयातील पाणी घाटघर येथील ऊर्ध्व जलाशयात खेचून घेतले जाते. आणि सकाळी व संध्याकाळी विजेच्या कमाल मागणीच्या काळात वीज निर्मिती करण्यात येते.

Bhandardara

अकोल्यापासून चे अंतर : 36.2 कि.मी.
धरणाचा उद्देश : सिंचन, जलविद्युत निर्मिती.
अडवलेल्या नद्या: प्रवरा.
स्थान : शेंडी.
सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
उंची : ५०७ मीटर.
रुंदी : (तळाशी) ८२.२९.
बांधकाम सुरू: १९१०.
उद्घाटन दिनांक: १९२६.
बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०.
ओलिताखालील क्षेत्रफळ : ५७०००हेक्टर.
जलाशयाची माहिती: क्षेत्रफळ १५.५४.
क्षमता : 11 टीएमसी
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती: टर्बाइनांची संख्या १.
महत्तम उत्पादनक्षमता : १० मेगावॅट.
भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७०गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.
दरवाजे: प्रकार : S – आकार लांबी : १९८.१० मी. सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी. क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
वीज उत्पादन: टप्पा १ जलप्रपाताची उंची : ६५ मी जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : १० मेगावॅट विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट. टप्पा २ जलप्रपाताची उंची : ५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट
धरणाची माहिती : बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची : ८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला.


धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले.
धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.
धरणाच्या भिंतीलगतच एक मोठी बाग तयार करण्यात आलेली आहे. येथून अंब्रेला फॉलचा आनंद घेता येतो. तसेच धरणाच्या सर्व मो-यांमधून सोडले जाणारे पाणी पाहताना वेळ कसा भर्रकन निघून जातो ते कळतच नाही. धरणाच्या पाणीसाठ्यात वर्षभर बोटिंगची सेवा उपलब्ध आहे. धरणाच्या भव्य व अथांग पाण्यातून नौकानयन करण्याचा आनंद काही औरच असतो.

रंधा धबधबा Randha Waterfall

अकोल्यापासून चे अंतर : २४ कि.मी. रंधा धबधबा भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्य...