अकोल्यापासून चे अंतर : 36.2 कि.मी.
धरणाचा उद्देश : सिंचन, जलविद्युत निर्मिती.
अडवलेल्या नद्या: प्रवरा.
स्थान : शेंडी.
सरासरी वार्षिक पाऊस : ३२२० मिलिमीटर.
उंची : ५०७ मीटर.
रुंदी : (तळाशी) ८२.२९.
बांधकाम सुरू: १९१०.
उद्घाटन दिनांक: १९२६.
बांधकाम खर्च: १,१३,९०,०६०.
ओलिताखालील क्षेत्रफळ : ५७०००हेक्टर.
जलाशयाची माहिती: क्षेत्रफळ १५.५४.
क्षमता : 11 टीएमसी
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती: टर्बाइनांची संख्या १.
महत्तम उत्पादनक्षमता : १० मेगावॅट.
भौगोलिक माहिती: निर्देशांक १९.५४८२, ७३.७५७०गुणक: १९.५४८२, ७३.७५७०.

दरवाजे: प्रकार : S – आकार लांबी : १९८.१० मी. सर्वोच्च विसर्ग : १५१४.९९ घनमीटर / सेकंद संख्या व आकार : २, ( १२.५ X ७.९२ मी).
पाणीसाठा: क्षेत्रफळ : १५.५४ वर्ग कि.मी. क्षमता : ३१२.५९५ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य क्षमता : ३०४.१० दशलक्ष घनमीटर ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर.
कालवा: डावा कालवा लांबी : ७७ कि.मी. क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर.
उजवा कालवा: लांबी : ४५ कि.मी. क्षमता : ६.८२ घनमीटर / सेकंद ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर.
वीज उत्पादन: टप्पा १ जलप्रपाताची उंची : ६५ मी जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : १० मेगावॅट विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट. टप्पा २ जलप्रपाताची उंची : ५० मी जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्यूमेक्स निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट

धरणाची माहिती : बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम उंची : ८२.२९ मी (सर्वोच्च) लांबी : ५०७ मी.भंडारदरा जागेचा धरणाच्या दृष्टीने शोध १९०३ मध्ये ऑर्थर हिल या इंग्रज अभियंत्याने लावला. त्यानंतरचे सर्वेक्षण सहाय्यक अभियंता एच. ओ.बी.पुली यांनी कार्यकारी अभियंता एच. ओ.बी.शौब्रीज यांच्या मार्गदर्शनाखाली केले. पुढे धरण बांधण्याच्या कामास १९१० साली तत्कालीन चीफ इंजिनियर ऑर्थर हिल यांच्या हस्ते सुरु झाले. भंडारदरा हे त्याकाळचे भारतातील सर्वात उंच धरण म्हणून ओळखले जाते. ते चुना, वाळू यांच्या मिश्रणातून बांधण्यात आले. पुढे त्याला आधुनिक तंत्रज्ञानाने आधार देण्यात आला.
धरणाचे काम १९२६ साली पूर्ण झाले. त्याच वर्षी १० डिसेंबर १९२६ रोजी गवर्नर लेस्ली वेलस्ली यांच्या हस्ते धरणाचे उदघाटन करण्यात आले. धरणाला त्याकाळी विल्सन डॅम तर धरणाच्या पाणीसाठ्याला ऑर्थर लेक यांचे नाव देण्यात आले.
धरणाच्या २०० फुटावरील व्हॉल्व्हद्वारे पाणी नदीपात्रात सोडले असता ते खडकावरून खळखळ वाहत नदीपात्रात झेपावते. त्यावेळी ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते. म्हणून या धबधब्याला अंब्रेला फॉल असे म्हणतात. छत्रीच्या आकाराचे पाणी नदीपात्रात झेपावते तेव्हा पर्यटक भान हरपून ते दृश्य पाहत असतात. धबधब्यातून उडणारे असंख्य तुषार पर्यटकांना चिंब भिजवून टाकतात. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी जेव्हा स्पील वे मधून सोडले जाते तेव्हा ते पाणी प्रचंड वेगाने वाहत जाते. ते दृश्य नक्कीच अनेक वर्ष डोळ्यांसमोर तरळत राहते.
धरणाच्या भिंतीलगतच एक मोठी बाग तयार करण्यात आलेली आहे. येथून अंब्रेला फॉलचा आनंद घेता येतो. तसेच धरणाच्या सर्व मो-यांमधून सोडले जाणारे पाणी पाहताना वेळ कसा भर्रकन निघून जातो ते कळतच नाही. धरणाच्या पाणीसाठ्यात वर्षभर बोटिंगची सेवा उपलब्ध आहे. धरणाच्या भव्य व अथांग पाण्यातून नौकानयन करण्याचा आनंद काही औरच असतो.
No comments:
Post a Comment