अकोल्यापासून चे अंतर : 55.4 km.
किल्ले अलंगगड सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग ही नैसर्गिक रित्या अतिशय बेलाग आहे. या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे. या रांगेमधे आड, औढा, पट्टा, बितन, अलंग, मदन, आणि कुलंग असे एका चढ एक किल्ले आहेत. प्रवरा नदीच्या खो-यात आहे किल्ले अलंगगड. किल्लेप्रेमीचे आकर्षण ठरलेले अलंग, कुलंग आणि मदन हे त्रिकुट याच खोप्यात आहे. येथे कळसूबाई रांग नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभी आहे. नाशिककडे म्हणजे उत्तर बाजूला इगतपूरी तालूका असून दक्षिणबाजूला अहमदनगर मधील अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यामधील भंडारदराचे धरण प्रसिध्द आहे. रंधा धबधबा, भंडारदरा तसेच अमृतेश्वर मंदिर पहाण्यासाठी शेकडो पर्यटक या परिसरामध्ये भेट देत असतात. यामधील मोजकेच पर्यटक या भागातील दुर्गम किल्ल्यांना भेटी देतात. भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या मागे म्हणजे पश्चिमेला घाटघर नावाचे लहानसे गाव आहे. या गावापर्यंत गाडीरस्ता गेलेला आहे. घाटघर हे गाव अलंगगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे.
तीन चारशे मिटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे आहेत. हा प्रदेश दुर्गम आहे. त्यामुळे घाटघर मधून वाटाड्या घेणे सोईस्कर ठरते. तसेच सोबतच्या पाणपिशव्याही भरुन घ्याव्या लागतात. घाटघरपासून तीनएक कि.मी चालत गेल्यावर आपण अलंगगडावरून उतरणार्या एका दांडाजवळ पोहोचतो. तिव्र चढाच्या या दांडावरुन अलंगगडाच्या पश्चिम अंगाच्या पदरामधे पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या पदरात जंगल आहे. येथे झाडीबरोबर झुडुपेही खूप आहेत. झाडीच्या पट्टयामागे अलंगचा कातळमाथा दिसतो. या कातळमाथ्याला एक लहानसा सुळका आहे. त्याला लिंगी म्हणतात. अलंगच्या कातळमाथ्यावरुन पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ खाली वहातात त्याच्या खुणा दिसतात. लिंगीपासून डावीकडे तिसर्या ओहोळा जवळ गडावर जाणारा मार्ग आहे. झाडीत शिरुन तिसर्या ओहोळाच्या पायथ्याशी पोहोचावे लागते. येथून कातळ चढून आपण अलंगच्या कड्याला भिडतो. येथे असलेल्या काही पायर्या तुटल्यामुळे हा भाग काहीसा अवघड झालेला आहे. येथे दोराचा वापर आवश्यक आहे. बुजलेल्या दरवाजाच्या बाजूने आपण गडप्रवेश करतो. येथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला चालत जावे लागते. हा मार्ग कातळ कड्याच्या मध्यातून जात असल्यामुळे डावीकडे दरी आणि उजवीकडे कातळमाथा असतो.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे .
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे .
घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई, औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्यात घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० – १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० – ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

No comments:
Post a Comment