Saturday, February 17, 2018

ghatghar dam

अकोल्यापासून चे अंतर :58.0 km.
अधिकृत नाव :घाटघर.
धरणाचा उद्देश :जलविद्युत निर्मिती.
अडवलेल्या नद्या: प्रवरा.
स्थान :घाटघर धरण.
सरासरी वार्षिक पाऊस : ५००० मी.मी. पेक्षा अधिक .
महत्तम उत्पादनक्षमता : २५० मेगावॅट.
१२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला २२ कि.मी.अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी नगर जिल्ह्यांची हद्द संपते. घाटघरचा कोकणकडा पाहण्यासारखा आहे. ४५० मीटर खोलीची दरी व त्याच दरीतून एकटीच वाहणारी शाई नदी. भन्नाट रानवारा, जोराचा पाऊस, दाट धुके आणि त्या दाट धुक्याचा पदर बाजूला सरला कि कोकणच्या सृष्टी सौंदर्याचे मनोहारी रूप पहावयास मिळते. हिरवळीत आच्छादलेले डोंगर, उंचच उंच सरळ उभा कोकणकडा, दूरवर दिसणारा शहापूर तालुक्याचा भूभाग, कड्याला लागूनच असलेला जलविद्युत प्रकल्प, आगपेटीच्या आकाराच्या दिसणा-या गाड्या सारेच मनोहारी, विलोभनिय. घाटघर या ठिकाणी पावसाळ्यात ५००० मी.मी. पेक्षा अधिक पाऊस पडतो.
कोकणकड्याच्या खोलीचा वापर करून येथे घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्प जपानच्या जे.बी.आय.सी. या वित्त संस्थेच्या आर्थिक मदतीने साकारण्यात आला आहे. २५० मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प हा ‘पंप स्टोरेज’ प्रकारचा आशिया खंडातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. घाटघर येथे बांधण्यात येत आलेल्या ऊर्ध्व धरणातील पाणी डोंगरात खोदलेल्या बोगद्यातून जलविद्युत प्रकल्पात सोडले जाते. या पाण्याच्या आधारे अवाढव्य टर्बाइन फिरून वीज निर्मिती होते व पाणी बोगद्याच्या खालील बाजूला निम्न धरणात सोडले जाते. रात्री ११ नंतर सुमारे ७ तास विजेचा वापर करून चोंडे येथील निम्न जलाशयातील पाणी घाटघर येथील ऊर्ध्व जलाशयात खेचून घेतले जाते. आणि सकाळी व संध्याकाळी विजेच्या कमाल मागणीच्या काळात वीज निर्मिती करण्यात येते.

No comments:

Post a Comment

रंधा धबधबा Randha Waterfall

अकोल्यापासून चे अंतर : २४ कि.मी. रंधा धबधबा भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्य...