Wednesday, February 21, 2018

रंधा धबधबा Randha Waterfall


अकोल्यापासून चे अंतर :
२४ कि.मी.
रंधा धबधबा
भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात. येथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत २०कि.मी.च्या प्रवासानंतर अचानक 5० मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ, पाण्याचा तो शुभ्र धवल झोत, तुषारांचे वैभव अन त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू, तेथील निरव शांततेला भेदणारा प्रपाताचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते.
पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागुनच दुस-या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलीवूड मधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे ‘मैने प्यार किया’, ‘प्रेम’, ‘कुर्बान’, ‘राजू चाचा’ इतर अनेक गाजलेल्या चित्रपटांतील थरारक दृश्ये येथे चित्रित झालेली आहेत.

चितळवेडेफॉल Chitalvedhefall



अकोल्यापासून चे अंतर : 25 km 

क्षमस्व :चितळवेडेफॉलची माहिती लवकरच अपडेट होईल…
आपल्याकडे चितळवेडेफॉलची माहिती असेल तर जरूर आंम्हाला पाठवा, स्वागत केले जाईल.
आपल्याकडील माहिती पाठवा -
sahaneankush@gmail.com

गिरनाईल धबधबा


</>Photo Click - Ankush Sahane</h>


अकोले पासून चे अंतर : ६२ कि मी .
गिरनाईल धबधबा हा निसर्गच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा धबधबा आहे ,आकाशातून पडणाऱ्या सरींचे पांढऱ्या शुभ्र दुधामध्ये रूपांतर होताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा निच्चीतच निसर्गाचे आभार तुम्ही मानलं असे या धबधब्याचे रूप आहे , आशिया खंडातील २ नंबरची असणारी खोल दारी सांधण दारी च्या उजव्या बाजूला या धबधब्याचे सौन्दर्य तुम्हाला पाहावयास मिळते ,
इथे जाण्या साठी अकोले पासून काही मर्यादित बस आहेत ,राहण्याची सोया पण या ठिकाणी आहे ,बऱ्याच निसर्गया प्रेमींनी इथे आपले टेन्ट टाकून या ठिकाणचे सौंदर्य अनुभवले आहे ,तुम्हाला पण हे सौंदर्य अनुभवायचे असेल तर संपर्क करा ,

sahaneankush@gmail.com

नेकलेसफॉल Necklace Fall


अकोल्यापासून चे अंतर :

नेकलेस फॉल बघायला खरं तर पावसाळ्यात खूप गर्दी,अविराद सौंदर्यने नटलेल्या रतनवाडी पासून अवघ्या 1 कि.मी.च्या अंतरावर हा धबधबा पहायला मिळतो. दोन्हीबाजूने आलेल्या घळेतून पाणी पुढे जाऊन एकत्र येऊन फेसाळत पुढे झेप घेते, बघनाऱ्याला ते जसं आलंकार परिधान केलेल्या श्रीच्या गळ्यातील नेकलेस सारखा आकर्षक वाटतो.साधारण पणे जून ते सप्टेंबर पर्यंत हा पर्यटकांना आपल्या सौन्दर्याने आकर्षित करतो.सप्टेंबर मध्ये येणारी सोनकीची पिवळी धमक फुले यांच्या सौन्दर्यात भर पाडतात असा हा नेकलेस फॉल बघायला आला तर सोबत हेमांडपंथी रतनवाडी जवळील अमृतेश्वर भगवान महादेवाचे दर्शन होते सोबत रतनगड ही बघता येतो,अमृताने पावन झालेल्या अमृतवाहिनी प्रवरा नदीचेही उगमस्थान पहायला मिळते. चला तर मग केव्हा येताय रतनवाडी च्या नेकलेस फॉल ला भेट घ्यायला..!

Saturday, February 17, 2018

फोफसंडी Fofsandi

अकोल्यापासून चे अंतर :
सह्याद्री पर्वताच्या कुशीत मांडवी नदीच्या तीरावर कुंजीरगडाच्या पायथ्याशी हे एक निसर्ग नवल गाव या गावाचा इतिहास म्हणजे, स्वातंत्र्यपूर्व काळात पॉप नावाचा ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी रविवारी (संडे) ला यायचा त्यामुळे ह्या ठिकाणचे नाव ‘पॉपसंडे’ असे पडले पण कालांतराने ह्या नावाचा अपभ्रंश होऊन ‘फोफसंडी’ हे नाव पडले. ब्रिटीश काळातील पॉप ह्या अधिकाऱ्याचे ‘रेस्ट हाउस’ आजही आपल्याला पहायला मिळतो. तसेच गावच्या वायव्य दिशेस कुंजीरगड (कोंबडकिल्ला) आहे. व मांडवी नदीचे उगमस्थान ह्या गावच्या हद्दीत असून तेथे दर्याबाईचे मंदिर आहे.पूर्वीच्या काळी “मांडव्यगण” ऋषीने येथे तपश्चर्या केली होती. म्हणून ह्या नदीचे नाव मांडवी पडले ऋषींच्या तपाची गुहा आजही आपल्याला पहावयास मिळते. ऋषींनी गावातील पश्चिममुखी हनुमानाची प्रतिष्ठापना केलेली आहे. व खिंडीत कोतूळ रस्त्याच्या कडेलाच भव्य गुहा असून आजही ती वापरात आहे. हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीनचार तास उशिरा होतो आणिसूर्यास्त तीनचार तास लवकर होतो.थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहाआठ तासांचा असतो.अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)मार्गे अबीटखिंडीतूनएकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोफसंडी गावात पोहोचता येते. अकोलेपासून पासून अंतर ४० किलोमीटर आहे.

अलंग गड alanggad AlangFort amk

अकोल्यापासून चे अंतर : 55.4 km.
किल्ले अलंगगड  सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग ही नैसर्गिक रित्या अतिशय बेलाग आहे. या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे. या रांगेमधे आड, औढा, पट्टा, बितन, अलंग, मदन, आणि कुलंग असे एका चढ एक किल्ले आहेत. प्रवरा नदीच्या खो-यात आहे किल्ले अलंगगड. किल्लेप्रेमीचे आकर्षण ठरलेले अलंग, कुलंग आणि मदन हे त्रिकुट याच खोप्यात आहे. येथे कळसूबाई रांग नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभी आहे. नाशिककडे म्हणजे उत्तर बाजूला इगतपूरी तालूका असून दक्षिणबाजूला अहमदनगर मधील अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यामधील भंडारदराचे धरण प्रसिध्द आहे. रंधा धबधबा, भंडारदरा तसेच अमृतेश्वर मंदिर पहाण्यासाठी शेकडो पर्यटक या परिसरामध्ये भेट देत असतात. यामधील मोजकेच पर्यटक या भागातील दुर्गम किल्ल्यांना भेटी देतात. भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या मागे म्हणजे पश्चिमेला घाटघर नावाचे लहानसे गाव आहे. या गावापर्यंत गाडीरस्ता गेलेला आहे. घाटघर हे गाव अलंगगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे.
तीन चारशे मिटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे आहेत. हा प्रदेश दुर्गम आहे. त्यामुळे घाटघर मधून वाटाड्या घेणे सोईस्कर ठरते. तसेच सोबतच्या पाणपिशव्याही भरुन घ्याव्या लागतात. घाटघरपासून तीनएक कि.मी चालत गेल्यावर आपण अलंगगडावरून उतरणार्‍या एका दांडाजवळ पोहोचतो. तिव्र चढाच्या या दांडावरुन अलंगगडाच्या पश्चिम अंगाच्या पदरामधे पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या पदरात जंगल आहे. येथे झाडीबरोबर झुडुपेही खूप आहेत. झाडीच्या पट्टयामागे अलंगचा कातळमाथा दिसतो. या कातळमाथ्याला एक लहानसा सुळका आहे. त्याला लिंगी म्हणतात. अलंगच्या कातळमाथ्यावरुन पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ खाली वहातात त्याच्या खुणा दिसतात. लिंगीपासून डावीकडे तिसर्‍या ओहोळा जवळ गडावर जाणारा मार्ग आहे. झाडीत शिरुन तिसर्‍या ओहोळाच्या पायथ्याशी पोहोचावे लागते. येथून कातळ चढून आपण अलंगच्या कड्याला भिडतो. येथे असलेल्या काही पायर्‍या तुटल्यामुळे हा भाग काहीसा अवघड झालेला आहे. येथे दोराचा वापर आवश्यक आहे. बुजलेल्या दरवाजाच्या बाजूने आपण गडप्रवेश करतो. येथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला चालत जावे लागते. हा मार्ग कातळ कड्याच्या मध्यातून जात असल्यामुळे डावीकडे दरी आणि उजवीकडे कातळमाथा असतो.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे .
घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत. किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याची ११ टाकी आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष व एक छोटेसे मंदिर आहे. पूर्वेला कळसूबाई, औंढचा किल्ला, पट्टागड, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबागड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाई चा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.
घाटघर मार्गे:  किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्यात घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० – १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० – ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

मदन गड Madangad amk

अकोल्यापासून चे अंतर : 57.0 km.
अत्यंत कठीण एक गड म्हणजे मदनगड  Madangad किल्ला होय.
सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.
पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. मदनगडावरून अलंग, कुलंग ,छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई ,डांग्या सुळका ,हरिहर,त्रिबंकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.
१ आंबेवाडी मार्गे :-
मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे. इगतपुरी/कसारा – घोटी – पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस टी सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग,मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला होय. येथून मदनवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायर्‍या लागतात.या पायर्‍या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात.
२ घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर :
किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.
राहाण्याची सोय :
गडावर एक गुहा आहे. यात साधारण ३० जण राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात
सूचना :
गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.

रंधा धबधबा Randha Waterfall

अकोल्यापासून चे अंतर : २४ कि.मी. रंधा धबधबा भंडारद-यापासून उत्तरेस १० कि.मी.अंतरावर प्रवरा नदी ५० मीटर खोल दरीत झेपावते. त्य...